गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई वंचित बहुजनच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

वंचित बहुजनच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई, दि.४जून २०२०: वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून दोन वेळा आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.

त्यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यातून बहुजन आघाडीने धडा घेण्याची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version