बारामती फलटण रस्त्यावर दोन जीपची समोरा समोर जोरदार धडक

बारामती : फलटण रस्त्यावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन बोलेरो जीपची समोरा समोर धडक झाल्याने झाली दोन्ही वाहांना मध्ये फळबागांचे काम करणारे ३६ मजूर होते.या पैकी २३ अपघातग्रस्तना उप उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवले आहे.

सोमवार दि १६ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बारामती फलटण रस्त्यावर शहरा पासून जवळच नाशिक वरून फलटण मार्गे तासगाव कडे द्राक्ष बागेचे काम करण्यासाठी निघालेल्या MH-15-GV- 3323 या मालवाहतूक बोलेरो जीप मध्ये १४ कामगार मागे झोपले होते.तर फलटण तालुक्यातील जिंती येथुन लासुरण्याकडे डाळिंब बागेचे काम करण्यासाठी निघालेल्या मालवाहतूक जीप क्रमांक MH-45 – 4908 मध्ये २२ कामगार होते. सामोरा समोर झालेल्या अपघातातील जखमींना हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या असुन गाडीमध्ये रक्ताचे थारोळे साठले होते.अपघातातील काही रुग्णनांना गावडे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालया मध्ये ५ जखमींना तर सिल्व्हर जुबालि हॉस्पिटलमध्ये १८ जखमींवर उपचार सुरू आहे.सकाळी सहा वाजता बारामती शहराच्या जवळ गुळुमकर वस्ती येथे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोलेरो जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली यावेळी अपघातातील जखमींना जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी गाडीतून बाहेर काढले त्यांनतर अंबुलन्स ने या जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवले आहे.या अपघातात जितेंद्र भोसले यांना गंभीर दुखापत झाली आहे.अपघातातील जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रोहिदास मावळे,युवराज वारडे,चंद्रकांत महाले,जनार्दन महाले,ड्रायव्हर नाव माहीत नाही(सर्व राहणार नाशिक) तर जिंती वरून लासुरण्याकडे जाणाऱ्या गाडीत जितेंद्र शिवाजी भोसले,रामचंद्र मारुती चौगुले, राजेंद्र दिनकर वाघमारे,विजय बाळासो काकडे,बाळासो पांडुरंग मोरे,रामचंद्र सायबु करे, राजाराम गोपीचंद भोसले, शहाजी हनुमंत साबळे,अंबादास महादू बैलम,माणिकलाल पांडुरंग सुतार,मधुकर सखाराम राणवरे,नवनाथ रामचंद्र करे, जगन्नाथ शिंदे,सचिन शांतीलाल रणावरे, पोपट मोरे,जितेंद्र भिसे,बापू राजाराम मोरे,रवींद्र मारुती घाडगे ( चालक )सर्व राहणार जिंती तालुका फलटण तर दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा