सोलापूर सांगोला रोडवर भीषण अपघात, २ जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी

सोलापूर, २७ फेब्रुवारी २०२४ : सोलापूर -मिरज या महामार्गावर मंगळवेढ्यानजिक आंधळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर या अपघातात वाहन चालक, दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत. सचिन कुंभार वय २५ व लक्ष्मी कुंभार वय २४ राहणार अफजलपुर, जिल्हा विजयपुर अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आंधळगाव जवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता त्याला पाठीमागून क्रुझर जीपने जोराचे धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. क्रूजर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून KA २७ बी ८१८८ असा या गाडीचा नंबर आहे. अपघात इतका भीषण होता की क्रुझरचे समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता. शेवटी जेसीबी बोलावून क्रुझरला ओढून जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील १०८ क्रमांक ॲम्बुलन्सचे डॉक्टर वैभव जांगळे व पायलट सुरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा