गोल पोस्ट महाराष्ट्र भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, वीज कोसळून दोघांचा मृत्यु

भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, वीज कोसळून दोघांचा मृत्यु

भोकरदन, २७ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन तालुक्यात काल संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर वादळवाऱ्यासह वीजा कडाडल्या. त्यामध्ये कुंभारी येथील विवाहिता पल्लवी विशाल दाभाडे (वय २१) ही महिला शेतातून घरी येत असताना तिच्या अंगावर वीज कोसळली. यात ती जागीच ठार झाली. तिच्या पश्चात पती व दोन वर्षांचा चिमुकला मुलगा असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गनपत कड (वय ३८) हे गावाजवळील गट क्रमांक ६९, या शेतात असताना ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच भोकरदन, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, पद्मावती, सावंगी, दानापूर, वालसावंगी, आदी परिसरत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version