पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार, गोळीबारात दोघांचा मृत्यू

17
उरळीकांचन, 23 ऑक्टोंबर 2021: लोणी काळभोर हद्दीतील उरळीकांचन येथे पूर्व पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात एका वाळू व्यावसायिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे सोलापूर रोडवरील उरुळी कांचन येथील हॉटेल सोनई समोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोरांवर प्रतिहल्ला देखील करण्यात आला. यामध्ये स्वागत खैरेचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करीत होते. तेवढ्यात एका चार चाकी वाहनातून चार ते पाच जण आले त्यांनी संतोष जगताप यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये संतोष हे गोळ्या लागताच खाली कोसळले. जगताप यांनी जखमी अवस्थेतही हल्लेखोराना प्रत्युत्तर देत त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर इतर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हल्लेखोरां मध्ये स्वागत खैरेचा जागीच मृत्यू झाला.
 जखमी झालेल्या जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा