पुणे-नगर महामार्गावर दोन पीएमपीएमएल बसेसची समोरासमोर जोरदार धडक

पुणे, १ ऑगस्ट २०२३ : पुणे-नगर महामार्गावर बीआरटी मार्गात पीएमपीएमएल बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली आगारातील बस कात्रजहून वाघोलीकडे येत असताना, तसेच नतावाडी आगारातील बस तळेगाव ढमढेरेहुन मनपाकडे जात असताना या दोन्ही बस बीआरटी मार्गात समोरासमोर धडकल्या. ही घटना आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास बीआरटी थांब्याच्या परिसरात घडली.

या बसचा वेग जास्त असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग अक्षरश: समोरील बसमध्ये घुसल्याने अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. तर इलेक्ट्रिक बसचा वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, अतिवेगात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या अशा वाहन चालकांवर कार्यवाही होणार का? असा प्रश्न बस प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पीएमपीएमएलचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा