गोल पोस्ट दहशतवाद काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर, ३० सप्टेंबर २०२३ : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव आज सुरक्षा दलांनी उधळला. मछल सेक्टरमधून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिक कुपवाडा जिल्हा अंतर्गत मच्छल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर कुमकारी हैहामा भागात गस्त घालत होते. दरम्यान, आज पहाटे दहशतवाद्यांनी ‘पीओके’मधून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

कुपवाडा येथे मारल्या गेलेल्या घुसखोरांकडून दोन असाॅल्ट रायफल, चार मॅगझिन, ९० काडतुसे, एक पिस्तूल आणि पाकिस्तानी चलनातील २१०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version