मजुरीचे पैसे घ्यायला बोलावून दोघांना बेदम मारहाण, सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर, २२ ऑगस्ट २०२२: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये उघडकीस आहे. येथिल दोन मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी बोलावून त्यांना दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांच्यातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.

माढा तालुक्यातील भूत आष्टी गावांमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील मजूर विकास नाईकवडे आणि कसबे या दोन मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी घरी बोलवण्यात आले. पैसे मिळण्याच्या आशेने तेही पैसे घेण्यासाठी गेले. परंतु पुढे घरी आलेल्या या मजुरांना जबरदस्तीने हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांच्या समाधान झाले नाही तर त्यांना दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळही केली. मारहाण केल्याचा व्हिडिओ ही व्हायरल झालेला आहे

भुताष्टे गावातील मुकादम बालाजी मोरे यांचे लाईट पोलचे काम चालू आहे. त्यांच्याकडे विकास नाईकवाडे आणि कसबे हे मागील दोन महिन्यापासून काम करत होते. कामाचे पैसे घ्यायला बोलावून, त्यांना मारहाण आणि अपहरण प्रकरणी माढा पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात अपहरण, मारहाण आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माढा पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा