गोल पोस्ट महाराष्ट्र वाहतुकीसाठी बंद असलेल्या मनमाडमधील खचलेल्या पुलावरून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

वाहतुकीसाठी बंद असलेल्या मनमाडमधील खचलेल्या पुलावरून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

मनमाड, नाशिक २५ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या पुलावरून अचानक दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या पुलावरून केवळ एक दोनच व्यक्ती ये जा करू शकतात एवढीच जागा शिल्लक आहे. मात्र दुचाकीस्वार हे आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून येजा करीत असल्याने या अरुंद जागेवर नागरिक व दुचाकी वाहनाची गर्दी होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन, बेकायदेशीरपणे पुलावर वाहने घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version