गोल पोस्ट स्पॉटलाइट संगीत “त्या “भारतीय डान्सवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी फिदा

“त्या “भारतीय डान्सवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी फिदा

नवी दिल्ली, दि.९ जून २०२०: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचे भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला बॉलिवूडच्या गाण्यांचंही फार वेड आहे. त्यातच त्याने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर आपल्या मुलीसोबत डान्स देखील केला होता. मात्र त्यानंतर त्याने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला होता. तो तिकडच्या गाण्याचा फॅन बनला. मात्र आता तो पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेत आला आहे.

दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन आणि ज्युनियर NTR या दोघांच्या प्रसिद्ध गाण्यावर वॉर्नर पती-पत्नीने ताल धरला होता. पण आता मात्र वॉर्नर प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसून येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

मासूम चित्रपटातील ‘ये जो तेरे पायलों की छनछन है’ या लोकप्रिय गाण्याची आणि त्याही पेक्षा महत्वाचे त्या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका भारतीय जोडप्याची वॉर्नर दाम्पत्याला भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे.

या प्रसिद्ध गाण्यावर एक जोडपं शेतातील पायवाटेजवळ झकास डान्स करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वॉर्नर ने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओतील अर्ध्या भागात वॉर्नर पती-पत्नी हा डान्स पाहण्याचा आनंद घेत आहेत. इतकेच नव्हे तर ‘हा डान्स खूपच सुंदर आहे. मला डान्स खूप आवडला’, असं कॅप्शनदेखील वॉर्नरने त्या व्हिडीओखाली दिले आहे.

त्यामुळे सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा माध्यमांवर रंगू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version