मुंबई : ऍपवर आधारित टॅक्सी सेवा उबेरला फूड डिलिव्हरीत जम बसवता आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उबेरने ‘उबेर इटसचा व्यवसाय प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या ‘झोमॅटो’ला विकला आहे. हा व्यवहार जवळपास २४८५ कोटी रुपयांना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उबेर इटसने आजपासून हजारो रेस्टोरंट , डिलिव्हरी पार्टनर आणि यूजर्सची सेवा बंद केली आहे.असल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे ‘उबेर इटस्’मधील ३४५ कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
भारतात २०१७ साली ‘उबेर’ने ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. ही ‘उबेर इटस्’ची मुख्य स्पर्धा झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांसोबत होती. मात्र दोन वर्षांत ‘उबेर इटस्’ ला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेच गेल्या पाच महिन्यांत कंपनीला २१९७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
त्यामुळेच ‘उबेर इटस्’ ने हा मोठा निर्णय घेत आपल्या ऍपवरील रेस्टॉरंट पार्टनर, डिलिव्हरी पार्टनर आणि ग्राहकांना झोमॅटोच्या प्लॅटफॉर्मवर नेले आहे. या व्यवहारानंतर ‘उबेर’कडे झोमॅटोतील ९.९९ टक्के भागीदारी राहील.
या व्यवहाराने ‘झोमॅटो’ला आपली ताकद वाढवता येईल. त्यामुळे ‘झोमॅटो’चे नेटवर्क आणखी मजबूत होईल, असे मत ‘झोमॅटो’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांनी व्यक्त केले.मात्र ‘उबर इटस्’मधील २४५ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत ‘झोमॅटो’ने अद्याप निर्णय घेतलेला नाही. अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे.