गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेनेत बंडखोरीनंतर उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेत बंडखोरीनंतर उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, २३ ऑगस्ट २०२२: शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी सुरुच केली आहे. आता शिवसेनेतून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडात उदय सामंत देखील सामील झाले आहेत.

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई सध्या सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठ्या बंडखोरी नंतर शिवसेना पक्षातिल मोठे आणि महत्त्वाचे नेते गेल्याने पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश काढत उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत आणि यशवंत जाधव यांनी शिवसेना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका लावला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version