मुंबई, दि. २३ जुलै २०२०: ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली.”छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला याच्या एवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे यांनी पुढे सांगितले.
तसेच या प्रतिक्रियेनंतर शिवप्रेमी हे छत्रपती उदयनराजे यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून सोशल मिडियातून जाब विचारत अनेक शिवप्रेंमीनी आपल्या भावनेला वाट मोकळी करुन दिली. तर “यापुढे हे असे चालायचेच याची सवय होईल” असे अनेक प्रखर टोले देखील यावेळी लगावण्यात आले.
त्यातीलच नाराज शिवप्रेमीचे काही कमेंटचे फोटो खाली दिले आहेत.
तसेच काही राजकारणी नेत्यांकडून देखील या गोष्टींचा निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली. भाजपचं तोंडबंद आंदोलन : संजय राऊतांनी असे केलं ट्वीट
तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही याचा निषेध व्यक्त करत “भाजप औरंगजेबासारखं राज्य चालवतेय” : अशी घणघाणाती टिका केली.