साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा 2 लाख मतांनी पराभव होईल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
शरद पवार साताऱ्यातून लढले तर मी निवडणूक लढणार नाही. मात्र शरद पवार निवडणूक लढणार नाहीत हे उदयनराजेंना माहित आहे, त्यामुळे त्यांचा तो दिखाऊपणा होता, असंही चव्हाण म्हणाले.
राष्ट्रावादीच्या तिकीटावर उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र, त्यांनी चार महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होणार आहे.
त्यामुळे सातार्याच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.