“उद्धवा अजब तूझे सरकार “- डोंबिवलीच्या मनसे शहराध्यक्षांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण, २ सप्टेंबर २०२०: कल्याण डोंबिवलीतील वीज महावितरणाकडून नागरिकांची लूट सूरू आहे. नागरिकांना अवाजवी बिलं दिली जात आहेत, अशी टिका कल्याण डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे . ”उद्धवा अजब तूझे सरकार” असे म्हणत त्यांनी  ठाकरे सरकारवर बोचक टिका केली आहे.

भाजपचे आमदार गणपत गाडकवाड यांच्या कार्यालयाचे ३ लाख बिल महावितरणाकडून कमी होऊ शकते मग सामान्य नागरिकांचे ५०० रूपये सुद्धा कमी केले जात नाहीत . “आधी बिल भरा , मग तक्रार करा ” असे भाष्य महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असे यावेळेस राजेश कदम म्हणाले. महावितरणाकडून सामान्य नागरिक आणि आमदार यांच्यात होणाऱ्या मतभेदाचा आणि ठाकरे सरकारचा मनसे शहराध्यक्षांनी यावेळेस निषेध केला.

ज्यांचं बिल हे ५०० ते १००० च्या घरात येतं, त्यांचं बिल या लॉकडाउनमध्ये जवळपास ५ ते ६ हजारांवर गेल आहे. त्यामुळे महावितरणाकडून घातलेला घोळ पहिल्यांदा सावरा असा इशारा राजेश कदम यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि नेते यांच्यातील मतभेद करणं सोडून वीज महावितरणाकडून सर्वांना समान वागणूक मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी या वेळेस केली.

गेल्या अनेक महिन्यापासून बिलवाढीचा हा प्रकार कल्याण डोंबिवली मध्ये सूरू आहे. त्रासलेल्या नागरिकांनी अनेक वेळा वीज महावितरणावर मोर्चा काढला. मात्र प्रत्येक वेळी त्यांची समजूत काढण्यात आली किंवा मग नसलेला हिशोब दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीतील मनसे -भाजपने ठाकरे सरकारला केलेला विरोध पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्वाच ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा