प्रारंभ एका नव्या पर्वाचा

Uddhav and Raj Thackeray Alliance
प्रारंभ एका नव्या पर्वाचा

न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे

गेल्या १८ वर्षानंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका राजकीय मंचावर एकत्र आले. पुन्हा व्ोगळे न होण्याचा संकल्प त्यांनी केला. िंहदी सक्तीविरोधात एकत्र आलेल्या या नेत्यांनी ठाकरे ब्रँडच्या अस्तित्त्वासाठी मनाची जळमटे दूर करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला, तरी एकत्र येण्यातील खरे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा अर्थ काय, राजकारणात काय बदल घडतील, याचे औत्सुक्य असणे स्वाभावीक आहे.

हिंदी सक्तीचा आदेश रद्द केल्यानंतर राज्य सरकारविरोधात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. अपेक्षेप्रमाणे मेळावा यशस्वी झाला. त्याचे पडसाद राज्यातच नव्हे, तर देशात उमटले. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत त्यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. वापरून फेकून देण्याची वृत्ती असलेल्यांना फेकून देणार, अशा शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला. उद्धव यांचे भाषण भाजपवर नेहमीप्रमाणे कठोर टीका करणारे होते, तर राज यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणात संदर्भ देत मराठी टिकवण्यासाठी एकत्र येणे कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले. मराठी टिकली पाहिजे. मराठी बोललेही पाहिजे. परंतु, त्यासाठी अन्य भाषिकांवर हल्ला करण्याचे दोन्ही बंधूंनी समर्थन केले.

अर्थात शिवसेनेला पूर्वीपासून लोकशाहीऐवजी ठोकशाही प्रिय आहे, हे व्ोगळे सांगायला नको. दोघांची भाषणे पाहिली, तर दोघांच्या एकत्र येण्याला आणि न येण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे जबाबदार आहेत, यावरच भर होता. याचा अर्थ भविषयात दोघांना कुणाविरुद्ध लढायचे आहे, हे नीट समजले आहे. िंहदी सक्तीने दोघे एकत्र आल्याचे दिसत असले, तरी त्याची प्रक्रिया गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झाली असावी. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातील ठाकरे ब्रँड अडचणीत आला आहे. दोन्ही ठाकरेंचे पक्ष संकटात सापडले आहेत. अस्तित्व टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मराठीच्या मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि पुतण्यांना ५९ वर्षांनी मराठीच्याच मुद्द्यावरून एकत्र याव्ो लागले, हा काव्यगत न्याय म्‌‍हवा लागेल. भाषेचा मुद्दा मराठी माणसासाठी भावनिक आहे.

त्या मुद्द्यावरून एका कार्यक्रमात एका मंचावर येणे सोपे होते. पण, दोन स्वतंत्र पक्ष चालवत युती करून राजकारण करणे सोपे नाही. कारण युतीमध्ये अनेक मर्यादा येतात. याची जाणीव ठाकरे बंधूंना आहे. पक्षावरील वर्चस्वावरून झालेल्या वादातूनच राज यांनी त्यांची व्ोगळी वाट धरली आणि मनसेची स्थापना केली. आता पुन्हा एकत्र येताना दोघांनाही तडजोडी कराव्या लागतील. उद्धव यांनी अगोदरच त्यागाची भाषा केली आहे. अर्थात महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीने दोघांनाही राजकीय अस्तित्त्वासाठी त्याग आणि तडजोडीचे राजकारण करण्याशिवाय पर्याय ठेवला नाही.

मुंबई महापालिकेवरील सत्तेमुळेच शिवसेना टिकली आणि वाढली हे निर्विवाद सत्य आहे. आता त्याच महापालिकेवरील सत्ता टिकवण्याचे आव्हान उद्धव यांच्यासमोर आहे. महापालिका हातातून गेल्यास उद्धव यांच्या पक्षाची स्थिती आणखी बिकट होईल, तर दुसरीकडे राज यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. गेल्या दोन दशकांपासून नाशिक वगळता कुठेही त्यांच्या पक्षाने सत्ता पाहिलेली नाही. उद्धव यांच्या पक्षासोबत युती केल्यास, त्यामुळे मुंबईत वारे फिरल्यास राज यांच्या पक्षाला थोडे बरे दिवस येऊ शकतात. असे असले, तरी मोठ्या माणसांचे इगोही तितकेच मोठे असतात. तू मोठा की मी मोठा, हा प्रश्न दोघांसाठी महत्त्वाचा आहे. इगोचा प्रश्न सुटला, तर अन्यही प्रश्न सुटतील. पक्षावरील वर्चस्वातूनच राज व्ोगळे झाले. आता युतीवरील वर्चस्वातून खटके उडाल्यास ठाकरे बंधूंच्या हाती फार काही लागणार नाही. राज आक्रमक भाषण करतात. त्यांची शैली बाळासाहेबांसारखी आहे. त्यांच्या भाषणात अनेक प्रभावी मुद्दे असतात.

पण, युती चालवत असताना उद्धव यांना राज यांची आक्रमकता किती आवडेल हा प्रश्न आहे. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेने ५० टक्के जागांची मागणी केल्याचे शिवसेनेतून सांगितले जाते. ही मागणी उद्धवसेना मान्य करण्याची शक्यता नाही. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव यांच्या नेतृत्त्वातील एकसंध शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला केवळ ७ जागांवर समाधान मानाव्ो लागले होते. हा फरक मोठा असल्याने उद्धवसेना ५० टक्के जागा मनसेला सोडण्यास तयार नाही. शिवाय, दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचे प्रभाव असलेले मुंबईतील प्रभाग सारखेच आहेत. गिरगाव, दादर, वरळी, प्रभादेवी, चेंबूर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड यांच्यासोबतच पश्चिम उपनगरात दोन्ही पक्षांचे प्राबल्य आहे. इथले अनेक प्रभाग कित्येक वर्षे शिवसेनेकडे राहिलेले आहेत. शिवसेनेच्या याच गडांना २०१२ मध्ये मनसेने सुरुंग लावला आणि महापालिका निवडणुकीत २८ जागा जिंकल्या होत्या.

यातल्या बहुतांश जागा शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत परत मिळवल्या. या जागा युतीच्या बोलणीत कळीच्या ठरू शकतात. हक्काच्या जागा सोडण्याची तयारी कोण दाखवणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथेच ठाकरेंची कसोटी लागेल आणि त्यांचे भवितव्य ठरेल.राज आणि उद्धव हे दोघे एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणेनंतर एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेतून शिवसेना आणि मनसे बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता एक मानसिक बदल घडलेला आहे. १८ ते २० वर्षानंतर त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटताना एक व्ोगळा आनंद दिसत आहे. दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या घोषणेअगोदर कार्यकर्ते मनाने एकत्र यायला लागले होते. त्याला संदीप देशपांडे यांच्यासारख्या काहींचा अपवाद होता;परंतु बाकीच्यांना मनोमन राजकीय अस्तित्त्वासाठी युती व्हावी, असे वाटत होते. दोन्ही ठाकरे एकत्र येतात, असे समजल्यानंतर पाशवी बहुमत हाताशी असताना, या ठाकरे बंधूंच्या शिडातील हवा काढून घेण्यासाठी शासनाने शासन निर्णय रद्द केला, ही एक महत्वाची प्रमुख घटना आहे.

राज यांचे वक्तृत्व आणि विचार करण्याची पद्धत, त्यांचा निर्भीडपणा तरुणांना आकर्षित करणारा आहे, ते गर्दी खेचणारे नेते आहेत; पण मते काही खेचू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला प्रशासन, संघटन या सर्वांचा अनुभव उद्धव यांच्याकडे आहे. त्यांचे नेटवर्क आहे. हे जाळे तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे आणि ते िंशदे यांच्यामुळे किंवा त्यांच्या शिवसेनेमुळे नष्ट झालेले नाही. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे राजकारणात बराचसा बदल दिसेल आणि याचा फटका िंशदे गटाला बसेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फुटली, ते लोकांना हे मनातून आवडले नाही. उद्धव यांची नीती स्वच्छ सरळ आहे आणि त्यांचे नेटवर्क आहे. त्यांचे काही आमदार आहेत. म्‌‍हणजे त्यांच्या हाताशी काहीतरी आहे. मनसेचे मंत्र पक्ष म्‌‍हणून वीस वर्षात वाढ काही झालेली नाही आणि वीस वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो. चहापानाला जाणे, जेवणावळी उठवणे हे सत्ताधारी पक्षांनी केले; परंतु अमित यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली नाही.

अमित निवडून आले असते, तरी भाजपच्या मनामध्ये सकारात्मक काही आहे असे म्‌‍हणता आले असते; परंतु अमितला निवडून आणता आले नाही, ही सल राज यांच्या मनातही असली पाहिजे. दोन ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्रामध्ये चालणारा हा ब्रँड हा कोणीच नाकारू शकत नाही. उद्धव आणि राज एकत्र येण्यामध्ये जनमताचा रेटा कारणीभूत आहे. ते काही मनाने एकत्र आलेले नाहीत. लोकांच्या मनातील जी भावना आहे, त्या भावनेने त्यांना एकत्र आणले आहे. मुंबईत पूर्वी जे मराठी मतांचे प्राबल्य होते, हे कमी झालेले आहे, ही गोष्ट खरी आहे आणि गुजरातीं तसेच उत्तर भारतीयांचे प्राबल्य वाढले, ही गोष्टदेखील तेवढीच खरी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्रिभाषा सूत्र मांडत होता, तेव्हा त्यामागे त्यांच्या मतांची बेगमी हेच त्याचे सूत्र होते. मुंबईला एकत्र ठेवण्यामध्ये शिवसेनेचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

त्यामुळे मुंबईमधला मराठी भाषिक दोन्ही ठाकरे यांच्यामुळे विभागला जाणार नाही. काँग्रेस सोडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील सर्व पक्षायांनी दोन्ही ठाकरे यांची युती मनापासून स्वीकारली आहे. त्यांची मते तसेच मुस्लिम मतेही आता उद्धव यांच्यामुळे शिवसेना-मनसे युतीला मिळू शकतात.मुंबई महापालिका आपल्या ताब्यात आणण्याचे भारतीय जनता पक्षाचे मोठे दिवास्वप्न आहे आणि हे स्वप्न त्यांनी बाळगणे हे महासत्ताशाली पक्षाला वाटणार यामध्ये अयोग्य काही नाही; परंतु त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करत असताना मराठी आणि िंहदी असा वाद आला. मराठीसाठी राज यांनी उद्धव यांच्याकडे जायचा प्रयत्न केला. हा राजकारणामधील बदल घडणार आहे. गेली दोन दशकाहून अधिक काळ ठाकरे बंधूंमध्ये संवाद नव्हता; पण मराठीच्या मुद्द्यावरून ते एकत्र आले आहेत. विजयी मेळावा फक्त ठाकरे बंधूंचा नव्हता, तर महाविकास आघाडीचादेखील होता. महाविकास आघाडीमधले तीन प्रमुख पक्ष आणि मनसे असे चार पक्ष व्यासपीठावर होते.

मुंबईत मराठीची मते ३० ते ३२ टक्के आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपच्या मागे असलेला मराठी मतदार वगळता इतर मतदार एकत्र येऊ शकतो. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा फटका िंशदे यांना बसणार आहे. फक्त मुंबईच नाही तर एमएमआरडी क्षेत्रातदेखील हा फटका बसणार आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे िंशदे यांच्या बाजूने मराठी मतदार राहणार नाहीत. राज आणि उद्धव यांचे पक्ष आदेशावर चालतात. ठाकरे यांनी एकत्र मोर्चा-मेळावा करण्याचा संदेश दिल्यानंतर परवापर्यंत एकमेकांविरोधात विधाने करणारे चटकन एकत्र आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मिता पकडून धरली, नितीशकुमार यांनी बिहारी अस्मिता धरून ठेवली, तेच इथेही होऊ शकते. मराठी लोक आता मुंबईतल्या बदलांकडे पाहात आहेत.

ज्या लोकांची लुटण्याची वृत्ती आहे, दादागिरी करत आहे, त्याविरोधात गोरगरिब आणि मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड राग आहे. तो या दोन भावांनी पंखाखाली घेतला आहे. असे असले, तरी या दोन पक्षांना एकत्र येऊन फक्त भाषेचा मुद्दा चालवता येणार नाही. आपण महाराष्ट्राला आणि मुंबईला काय देणार याचा एक पर्यायी अजेंडा त्यांना द्यावा लागेल. भाजप फार स्मार्ट राजकारण करत आहे. मुंबईत मराठीबरोबर इतर भाषिक लोक आहेत. मराठी ध्रुवीकरणाविरोधात याचा भाजप वापर करू शकतो. भाजपचे मुंबईबरोबर एमएमआर भागातही असलेल्या महापालिकांवर लक्ष आहे. आता या दोन्ही भावांना आपण एकत्र आलो, असे सांगून चालणार नाही, तर भाजपला पर्यायी अजेंडा द्यावा लागेल. मुंबईतील कोकणी मुसलमान, महाराष्ट्रातील इतर भागातून आलेले मुसलमान आणि उत्तर भारतीय मुसलमान यांचा कल कोव्हिड काळापासून उद्धव यांच्या बाजूने आहे. आज गरज आहे पर्सेप्शन तयार करण्याची. भाजप ज्या पद्धतीने पर्सेप्शन तयार करते, तसे आपण विरोधात पर्सेप्शन तयार करू शकतो यासाठी हे दोन पक्ष प्रयत्न करत आहेत. त्याला जनता किती साथ देते हे पाहायचे.