चौथ्या लॉकडाऊनच्या नियोजनासाठी उद्धव ठाकरेंची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा

10

मुंबई, दि. १३ मे २०२०: राज्यात १७ तारखेनंतर लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा यांचे नियोजन करून कळवावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातील किती त्यांच्या राज्यात परतल्याचा आढावा उद्योग विभागाने घ्यावा. एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या अशा सूचना या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून देण्यात आल्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी