गोल पोस्ट इतर राजकारण उद्धव ठाकरे सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला, किरीट...

उद्धव ठाकरे सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला, किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ : भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांविषयी मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी ओळखले जातात. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला १८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. मुलुंड येथील १८५० खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च १०.९४ कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने ३,५९,७८,३८९ प्रमाणे २५ महिने भाडे दिले आहे.

७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ असे २५ महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला ९० कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी १० कोटी रुपये दिले असे मिळून १०० कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांच्याकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील १५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version