उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री

20

मुंबई: १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेना पक्षातील हा सर्वात मोठा क्षण असेल. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळाला आहे. काही क्षणापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्ष मध्ये हे मुख्यमंत्रीपद खेचून आणले आहे असेच म्हणावे लागेल.
भाजप सोबत युती तोडून शिवसेनेने हे मुख्यमंत्री पद मिळवणे हा एक मोठा संघर्ष मानला जाईल तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभूतपूर्व घटना ही मानली जाईल. कारण एका बाजूला बहुमत असलेला भाजप होता तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे त्याहीपेक्षा अर्धे बहुमत असताना मुख्यमंत्रीपद पूर्ण पाच वर्षासाठी मिळविले आहे. बाळासाहेब ठाकरे त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले अशी भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा