उद्धव ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मुंबई, १९ जुलै २०२३ : अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारशी युती करत उपमुख्यमंत्री झाले. या प्रवेशानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत आपल्या काही समर्थकांसह बंड करत भाजपशी युती केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते.

वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ झाली. या राजकीय नाट्यानंतर पहील्यांदाच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले होते.

त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवार यांना बुके देत असल्याचे दिसत आहे. या बाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा