उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं? प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई, 24 जानेवारी 2022: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीवरून भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेनेने भाजपशी युती करून 25 वर्षे वाया घालवली, असं मला वाटतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाचे संस्थापक आणि त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व सत्तेसाठी आहे. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्हि हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

25 वर्षे त्यांना वाटलं नाही की सडलो आणि दोन वर्षात त्यांना वारंवार साक्षात्कार होतोय. त्याचं कारण सत्ता असूनही जी घुसमट, जे वैफल्य बाहेर पडताना दिसत आहे. 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचं आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही. राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीका दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

‘सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना’

चांगलं वागवलं म्हणूनच तुम्ही 25 वर्षे तुम्ही संसार केला. आता तुम्हाला कसं वागवलं जात आहे. आता सरकारमध्ये आहात पण सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना. मला सांगा, सरकार असूनही आपल्या आमदारांना किती निधी मिळाला याची आकडेवारी जाहीर करा सामनातून, शिवसैनिकांना कुठल्याप्रकारे लाभ मिलाला हे जाहीर करा. त्यांच्यात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांसाठी दोन अडीच लाख कोटी रुपये निधी नेला. त्यानंतर काँग्रेस आणि मग शिवसेना. त्यावरुन सरकारमध्ये काय चाललं आहे हे आपल्या लक्षात येतं, असा खोचक टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा