विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा चुकीचा निर्णय दिला तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, उद्धव ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत इशारा

मुंबई, १२ मे २०२३ : निवडणूक आयोगाने आमच्याकडून पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेताना इकडे काही वेडंवाकडं केले तर आम्ही न्यालायत जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

विधानसभा अध्यक्षांनी जर चुकीचा निकाल दिला तर त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि तातडीने निकाल द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

सध्या राज्यात जी काही अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर कोर्टाने परखड मत व्यक्त केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुच्या रक्षणासाठी स्थापन करून जोपासली, ती शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला आहे. हिंदुत्वाच्या बुरख्या खालचा भेसूर चेहरा उघडा पाडला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देत असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा