गोल पोस्ट इतर राजकारण उद्धव ठाकरे अजून शिक्षा भोगणार…..

उद्धव ठाकरे अजून शिक्षा भोगणार…..

जळगाव, ६ सप्टेंबर २०२२: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना खासदार नवनीत रणा हनुमान चालीसा पाठणावरून देशभरात चर्चेत आल्या होत्या. आता नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे विधान केले आहे. मविआ सरकार पडले आणि उद्धव ठाकरेंना घरी बसावे लागले ती फक्त सुरुवात होती, अशा शब्दात ठाकरेंना इशारा दिला आहे.

ठाकरेंवर निशाणा साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते. उद्धव ठाकरे यांनी धर्माचे काम करणाऱ्या माझ्यासारख्या महिलेला जेलमध्ये टाकले, त्याची शिक्षा ते भोगत आहेत. मात्र ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे. अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

यावेळी हनुमानाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, अशा शब्दांत नवनीत रणांनी हल्लाबोल केला. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही उद्धव ठाकरे असाल, तर मी पण नवनीत राणा आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, अमाना सामना तर लवकरच होईल व त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version