उद्धव ठाकरेंचा राजीनामा, फडणवीसांना मिठाई, शिंदेंच्या घरासमोर फुटले फटाके…

मुंबई, 30 जून 2022: उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदासोबतच त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं आहे. बुधवारी रात्री त्यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे, माझ्याकडे शिवसेना आहे आणि ती माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं सांगितलं.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात फ्लोअर टेस्ट प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा निर्णय आणि उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर नेते देवेंद्र फडणवीस यांना मिठाई खाऊ घालत असल्याचं चित्र समोर आलं. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर फटाके फोडण्यात आले. मिठाई वाटण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने 30 जून रोजी म्हणजेच आज फ्लोर टेस्टबाबत मोठा निर्णय दिला होता. पण फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फ्लोअर टेस्टपूर्वी उद्धव यांनी फेसबुक लाईव्ह केलं. फ्लोअर टेस्टशी माझा काहीही संबंध नाही, असं उद्धव यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलौ आहे. मी मुख्यमंत्री पद सोडत आहे.

आमच्या सरकारने जनतेसाठी काम केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने फ्लोर टेस्ट करण्यास सांगितलं आहे. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं अधिकृत नामकरण केल्याचं मला समाधान आहे. काही वेळापूर्वी न्यायालयाने स्पष्ट केले की उद्या सकाळी म्हणजेच 30 जून रोजी सकाळी 11 वाजता फ्लोअर टेस्ट होणार आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसने काही ठिकाणांची आणि प्रकल्पांची नावं बदलण्याची मागणी केली होती. या बैठकीत पुण्याचे नाव राजमाता जिजाबाई यांच्या नावावरून जिजाऊ नगर करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. याशिवाय शिवडी न्हावा देवा ट्रान्स हार्बर लिंकचे नाव बदलून बॅरिस्टर ए आर अंतुले करण्याची मागणीही काँग्रेसने केली होती.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी फ्लोअर टेस्टच्या निर्णयापूर्वी आनंद व्यक्त केला होता. न्यायालय तटस्थपणे निर्णय देईल, असे ते म्हणाले होते. काल सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्याचप्रमाणं आजही निर्णय येणे अपेक्षित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा