मुंबई,१ जुलै २०२३ : देशात होऊ घातलेला समान नागरी कायदा कधी लागू होईल यावर जोरदार चर्चा सुरु आहे. संघ- भाजपाच्या एजेंड्यावर असलेले अनेक कायदे मोदी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आले. भाजपाच्या वचननाम्यात असलेले कलम ३७०, राम मंदीर, ट्रिपल तलाक, असे एकेक आश्वासन पूर्ण केल्यावर, आता समान नागरिक कायदा लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. २२ व्या कायदा आयोगाने यावर नागरिकांचे मत मागवली आहेत. मागच्या काही निवडणुंकाआधी प्रत्येक वेळी भाजपा कडून त्यांच्या वचननाम्यात समान नागरी कायद्या आणण्याचे वचन देण्यात येत आहे.
देशातील समान नागरी कायद्यावर जोरदार चर्चा सुरु असून अनेक पक्ष याला विरोध करत आहे. तर अनेक पक्ष याचे समर्थनही करत आहे, आता ठाकरे गटानेही याचे जोरदार समर्थन केले आहे.जर संसदेत समान नागरिक कायद्याचे विधेयक आणले गेले, तर आम्ही त्याचे समर्थन करु, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नूसार, भाजपाला विरोध करणाऱ्या अनेक पक्षांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. ठाकरे गट, आम आदमी पक्ष, वायएसआर काँग्रेस पक्ष, बीजेडी असे अनेक पक्ष समान नागरी कायद्याला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. ठाकरे गटासाठी हा भावनिक मुद्दा आहे. जर ठाकरे गटाने याचा विरोध केला तर ते हिंदुत्वापासून लांब गेल्याचा आरोप त्यांच्यावर होवू शकतो.बाळासाहेब ठाकरे यांची तीन स्वप्न होती. ज्यात अयोध्या येथील राम मंदीर, काश्मीरमधून कलम ३७० हटवने आणि देशात समान नागरी कायदा लागू करणे. उद्धव ठाकरे यांनी वीस जून रोजी पत्रकार परिषद घेवून समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर