मुंबई: खाते वाटप नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) अचानक पत्रकार परिषद बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद आज दुपारी एक वाजेच्या सुमारास होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अचानक ही पत्रकार परिषद बोलावल्याने ते नेमकं काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत काही मोठी घोषणा करणार का? अशी देखील आता चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांची आज ८९ वी जयंती आहे. याच निमित्ताने उद्धव ठाकरे आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे देखील सोबत होते. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. मात्र, त्यावेळीच ते म्हणाले की, ‘मला देखील तुमच्याशी बोलायचं आहे. पण आता नाही. दुपारी एक वाजता मातोश्रीवर आपण या.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषदच बोलावली.
उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचं कर्ज, जेएनयूतील हाणामारी, जीएसटी थकबाकी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. तसंच उद्या (मंगळवार) मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही अत्यंत बड्या उद्योजकांची बैठकही बोलावली आहे. त्याविषयी देखील मुख्यमंत्री काही भाष्य करण्याची शक्यता आहे.
: खाते वाटप नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) अचानक पत्रकार परिषद बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद आज दुपारी एक वाजेच्या सुमारास होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अचानक ही पत्रकार परिषद बोलावल्याने ते नेमकं काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत काही मोठी घोषणा करणार का? अशी देखील आता चर्चा सुरु झाली आहे.