उद्या होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई: येत्या २४ तारखेला म्हणजेच उद्या मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी चर्चा चालू आहे. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे पहिले सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून, आता सारे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारची कामे वेगाने सुरू होतील शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच तिन्ही पक्षांमधील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा सहा मंत्र्यांचा शपथविधी शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर लगेच नागपूरला हिवाळी अधिवेशनास जाण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार केला जाऊ शकतो असे चर्चा सर्वत्र चालू आहे. सरकार स्थापन झाल्यापासून बरेच दिवस मंत्रिमंडळ विस्ताराचे कार्य निलंबनावर पडले होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ठाकरे सरकारच्या कामांना वेग मिळेल अशी शक्यता आहे. एक तर आधीच सत्ता स्थापनेत बराच विलंब झाला होता आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणाने खोळंबल्या मुळे बरीचशी कामे संथ गतीने चालू आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा