उत्तर प्रदेशातील आकाशात दिसला युएफओ…

लखनौ, १४ सप्टेंबर २०२२ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ व लखिमपूरसारख्या अनेक शहरांमध्ये १२ सप्टेंबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास आकाशात प्रकाशाची लांबलचक रांग दिसली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशात ट्रेनच्या डब्यांसारखे लांबलचक जळणारे दिवे दिसत होते. लोक सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडिओ शेअर करत आहेत. याआधी हिमाचल प्रदेशातील हमीरपुर येथेही आकाशातील अशीच गोष्ट दिसली होती. मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये जम्मू काश्मीर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा भागात, आकाशात अशीच वस्तू दिसली होती.

विश्वात आपण एकटे नाही याची प्रचिती मानवाला वारंवार येत असते. आकाशात अनेकदा युएफओ बघितल्याचे अनेकांनी सांगितले आहे. तर अनेकांनी एलियन्स बघितल्याचा दावा केला आहे. अगदी मनुष्य सुद्धा पृथ्वीच्या बाहेरील असून त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला नसल्याच्या संकल्पना देखील अनेकांनी मांडल्या आहेत.

एडीजी मुकेश सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, आकाशात दिसणारे हे दिवे उपग्रहाच्या स्टारलींक ट्रेनचा प्रकाश होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेसला व स्पेस एक्सचे मालक ॲलन मस्क यांचे ‘स्टारलिंक इंटरनेट सॅटॅलाइट’ होते. सध्या चाळीस देश याचा लाभ घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा