मुंबई: भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधारकार्ड हे आता अनिवार्य झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने नवीन अॅप लाँच केले आहे.
mAadhaar या अॅपमध्ये नागरिकांना आधार संबंधित अनेक सेवा मिळणार आहेत. यामध्ये आधार डाउनलोड करणे, त्याचे स्टेट्स चेक करणे, आधार रिप्रिंटसाठी ऑर्डर देणे आणि आधार केंद्राची माहिती मिळवणे याचा समावेश आहे.
यूआयडीएआयने जुने अॅप अनइंस्टॉल करून नवीन अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे.
अॅपवरील सेक्शन:
मुख्य सर्विस डॅशबोर्ड, रिप्रिंट ऑर्डर, पत्ता बदलणे, ऑफलाइन ई-केवायसी डाउनलोड, क्यूआर कोड स्कॅन.
माय आधार सेक्शन यामध्ये आधार प्रोफाइलसाठी पर्सनलाइज्ड सेक्शन मिळणार आहे.