उजनी धरण आज आले प्लसमध्ये

सोलापूर , १८ जुलै २०२० : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले उजनी धरण शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता प्लसमधे आले आहे. मागील चार ते पाच वर्षांनंतर सोलापूर जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

तसेच सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्याने यंदा जुलै महिन्यातच धरणात जवळपास साडेतीन टीएमसी पाणी वाढले आहे.

यावर्षी एक जूनला पावसाला सुरुवात झाली. एक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. जून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

माढा तालुक्यात २५० मि. मी.पावसाची नोंद झाली आहे.यामुळे उजनीच्या एकूण पाण्याचा टीएमसी ६३.६६ ऐवढा आहे.

उजनीची सद्यस्थिती :

एकूण पाणी पातळी ४९१.०३०.मीटर

एकूण पाणी साठा १८०२.८२ दलघमी
(टीएमसी ६३.६६)

उपयुक्त पाणी साठा ०.०१ दलघमी
(टीएमसी ०.०)

टक्केवारी ०.०१

दौंडमधून विसर्ग २२२३ क्यूसेक.

न्युज अनकट प्रतिनिधी :प्रदीप पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा