उजनीची वाटचाल ७५ % कडे

6

माढा, २१ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरीही उजनीत बंडगार्डन व दौंडमधून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे उजनीचा पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १ ऑगस्ट रोजी उजनीचा एकूण पाणी साठा प्लस १२ टक्के होता. एकूण पाण्याचा साठा ७० टीएमसी होता. बरोबर २० दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी उजनी धरण ६६ टक्के पाणी होते. तर एकूण पाण्याचा ९९ टीएमसी साठा होता. म्हणजेच ३० टीएमसी पाणी साठा झाला. तर पाण्याची टक्केवारी ६७ टक्के झाली. म्हणजेच २० दिवसात ५४ टक्के पाणी उजनीचे झाले. अजूनही बंडगार्डन व दौंडमधून विसर्ग मोठ्या प्रमाणात येत असल्याने येत्या दोन दिवसात उजनीची टक्केवारी ७५% होईल या धरणसाठ्यात सततच्या वाढत चाललेल्या पाण्याने शेतकरी समाधानी झाला असून येणा-या वर्षात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात शेतीसाठी पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी ४९५.१४५ मीटर

एकूण पाणी साठा २७९३.५१ दलघमी
(९९ टीएमसी)

उपयुक्त पाणी साठा ९९०.७० दलघमी
(३५ टीएमसी)

टक्केवारी ६७.५९ %

विसर्ग

बंडगार्डन ११०६१ क्यूसेक विसर्ग

दौंडमधून १३७६२ क्यूसेक विसर्ग

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा