बहुचर्चित उजनी धरण अखेर सोमवारी शंभर टक्के भरलं

माढा, दि. ३१ ऑगस्ट २०२०: पुणे,सोलापुर आणि नगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या नजरा उजनी धरणावर प्रत्येक वर्षी लागून राहिलेल्या असतात. सुमारे 123 टीएमसी एवढे महाकाय उजनी धरण मोठे असून संपूर्ण वर्षभर तिन्ही जिल्ह्यातले मिळून पन्नास ते साठ साखर कारखाने 15 एमआयडीसी अनेक नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका यांना पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरण उपयोगी ठरते.

गेल्या वर्षी शंभर टक्के भरलेली उजनी धरण मायनस 27 टक्केपर्यंत गेले होते. परंतु गेले काही दिवस पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील घाटमाथ्यावर सतत पडत असणाऱ्या पावसामुळे उजनी धरणावरील जवळपास 19 धरणे भरत आल्याने या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढतच गेला.

हे पाणी उजनी धरण भरण्यासाठी उपयोगी ठरले यामुळे उजनी धरणावर असणाऱ्या सर्व उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, 12 मेगावॅाट वीजनिर्मिती प्रकल्प तसेच उजनी धरणातून भीमा नदी,कालवा, सीना नदीतून बोगद्याद्वारे सोडलेले पाणी या सर्व योजना कार्यान्वित झाल्या असून प्रशासनाने सर्व बंधारे पाणीपुरवठा योजना या सर्वांना पाणी देण्याचे वेळापत्रक बनविण्याचे काम सुरू केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा