नवी दिल्ली: ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील ६५० जागांपैकी ३२५ जागांवर हुजूर पक्षाला विजय मिळाला आहे.
यापूर्वी एक्झिट पोल्सनी बोरिस जॉन्सन यांच्या मोठ्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जुलै महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती.
यावेळी बोरिस जॉन्सन म्हणाले की, ब्रिटनच्या लोकांनी आम्हाला तगडे जनमत दिले आहे. हे जनमत देश एकसंध ठेवण्यासाठी आणि ब्रेक्झिट अंमलात आणण्यासाठी आहे.
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन केले आहे.