गोल पोस्ट गुन्हा उल्हासनगर येथे तरुणाची हत्या

उल्हासनगर येथे तरुणाची हत्या

उल्हासनगर : उल्हासनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास धुरुबारच्या आवारात एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. आठ ते दहा जणांच्या टोळीने हा हल्ला करण्यात आला. मध्यरात्री धूरु बारच्या आवारात दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले. यात माणेरे गावातील रहिवासी दिपक भोईर याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माणेरे गावातील रहिवासी दीपक भोईर नामक तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या धुरुबारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने दीपकवर जीवघेणा हल्ला केला. यात दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेतील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या धिरुबारच्या आवारातील दुसरी घटना आहे. या हत्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version