कराची: भारत बऱ्याच दिवसापासूनच युनायटेड नेशन मध्ये एक कायम स्वरुपी सभासद होण्याची प्रयत्न करत आहे. यू एन मध्ये सभासदत्व आणणे म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते. जागतिक स्तरावर जे काही निर्णय घेतले जातात ते यू एन मध्येच घेतले जातात. देशांतर्गत वाद असो किंवा आंतरराष्ट्रीय वादविवाद असो सर्व प्रकरणे येथे येतात आणि त्यावर निर्णय घेतला जातो. यात सभासदत्व असणे म्हणजे जागतिक घडामोडींमध्ये किंवा निर्णयांमध्ये त्या देशाचे मत महत्त्वाचे मानले जाते.
पंडित नेहरू पंतप्रधान असताना भारताला यू एन मध्ये सभासदत्व मिळत होते परंतु त्यावेळेस त्यांनी ते नाकारले होते.त्यानंतर आजपर्यंत भारत येथे सभासदत्व मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. सध्या युनायटेड नेशन चे पाच कायम स्वरुपी सभासद आहेत. त्यात अमेरिका, चीन, रशिया आणि युनायटेड किंग्डम.
चीन नेहमीच भारताच्या सभासदत्व विरोध करत आला आहे त्यामुळे भारताला येथे कायमस्वरूपी सभासदत्व मिळालेले नाही. आपल्या शेजारील देश आपल्या बरोबरीला नको असल्या कारणाने चीन असे करत आहे. सध्या अनेक देश भारताला कायम स्वरुपी सभासद होण्यासाठी समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मनीने म्हंटले होते की, जी४ देशांमध्ये भारत हा यू एन सभासदत्व साठी प्रमुख दावेदार आहे. याच वक्तव्यावर पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, जी४ ग्रूप मध्ये एक असा देश आहे जो यू एन मध्ये कायमस्वरूपी काय तर तात्पुरत्या स्वरूपाचे सभासदत्व मिळवण्या योग्य सुद्धा नाही. असे पाकिस्तान अप्रत्यक्ष रित्या भारताला म्हंटला आहे. पाकिस्तान काश्मीर मुद्दाम नेहमीच यू एन मुद्दा काश्मीर मध्ये न्हेत आला आहे आणि पाकिस्तान कधीही अशी इच्छा ठेवणार नाही की भारत यात कायम स्वरुपी सभासद होईल.