अवैध मावा, बंदी असलेला गुटखा विक्री प्रकरणी काका पुतणे दोघे अटकेत

निरा (पुरंदर), दि. २० जून २०२०: महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला अवैध गुटखा व घातक मावा विक्री केलेल्या प्रकरणी नीरेतील काका पुतन्याला अटक केली आहे. सुमारे १७ हजार चारशे रुपयांचा प्रतिबंधीत अन्नपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. घातक पदार्थ विक्री करणाऱ्यांवर जेजुरी नीरा पोलीसांनी धडक कारवाई करत मुद्देमालासह या दोघांना ताब्यात घेतल्याने नीरा परिसरातील अवैध मावा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नीरा येथील पुणे – पंढरपूर पालखी मार्गावरील समर्थ पान शॉप येथील ईश्र्वर केशव पवार (वय ५०) व विक्रम बजरंग पवार (वय ३०) रा.नीरा प्रभाग ४ यांनी प्रतिबंधीत पदार्थ बाळगत गुटखा किंवा पानमसाला बनवने असे पदार्थ उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक तसेच विक्री केलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात नीरा येथील पंढरपूर पालखी मार्गावरील समर्थ पान शॉप मध्ये अवैध व घातक पदार्थ विक्री होत असल्याचे समजल्याने जेजुरी पोलीसांनी धडक कारवाई केली. या धडक कारवाईत रत्ना प्रीमियम ३००० सुगंधी तंबाखू किंमत ६८०४, रत्ना प्रीमियम ३०० सुगंधी, सुगंधी सुपारी किंमत २४८४, आर एम डी गुटका २३ रुपये, ६२० पानमसाला १६० रुपये, विमल रेड पॅकेट २६४ रुपये विमल पर्पल पैकी १३२ रुपये, कातरलेली सुपारी ७ हजार रुपये असा एकूण १७ हजार ४४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

‌ महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधित आदेश व अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला किंवा तंबाखू किंवा अंतिम गुटखा व पानमसाला घटीत होऊ शकेल असा पदार्थ, सुगंधी किंवा स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादीचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक तसेच विक्री यावर बंदी घातली असून सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच भारतीय दंड विधान १८८ चे उल्लंघन केले आहे. सदर प्रतिबंधित पदार्थाचासाठा हा जन आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याने विक्री वाहतूक साठा याकरिता प्रतिबंधित असून सदर प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने मुखाचा कर्करोग, ओरल सबम्युकास, पायब्रॉंसेस, गुणसूत्रातील विल्लग्र इत्यादी शारीरिक हानी होत असल्याने भारतीय दंड विधान कलम २७२,२७३ व ३२८ सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ व ५९ चे उल्लंघन केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विभागीय अन्नसुरक्षा व औषध प्रशासन सह आयुक्त शुभांगी बाळकृष्ण अंकुश यांनी फिर्याद दाखल केली आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली‌ फौजदार विजय वाघमारे करीत आहेत. या धडक कारवाईत पोलीस हवालदार गोविंद भोसले, सुदर्शन होळकर, पोलीस नाईक संदिप कारंडे, राजेंद्र भापकर, पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र बिरुंगले, निलेश जाधव यांनी धडक कारवाईत सहभाग घेतला होता. नीरा व जेजुरीच्या पोलीसांनी धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांन वर पोलिसांचा मोठा वाचक निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा