धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने मिळवला विजय, हैदराबादचा 13 धावांनी पराभव

SRH vs CSK, 2 मे 2022: रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला. या मोसमात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा हा पहिलाच सामना होता, ज्यात त्याने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 202 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात हैदराबादला 189 धावाच करता आल्या.

चेन्नई सुपर किंग्जने हा सामना 13 धावांनी जिंकला, सीएसकेचा या मोसमातील हा तिसरा विजय असून त्यांचे आता 6 गुण झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने 99 धावांची शानदार खेळी खेळली. पण त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक हुकले. ऋतुराज-डेव्हॉन कॉनवे यांनी 182 धावांची विक्रमी भागीदारी केली.

हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार केन विल्यमसनने 47 धावांची शानदार खेळी खेळली, तर शेवटी निकोलस पूरनने 33 चेंडूत 64 धावा केल्या. निकोलसने या खेळीत 3 चौकार, 6 षटकार मारले.

सनरायझर्स हैदराबाद डाव – 189/6
पहिली विकेट – अभिषेक शर्मा 39 धावा, 58/1
दुसरी विकेट – राहुल त्रिपाठी 0 धावा, 58/2
तिसरी विकेट – एडन मार्कराम 17 धावा, 88/3
चौथी विकेट – केन विल्यमसन 47 धावा, 126/4
पाचवी विकेट – शशांक सिंग 15 धावा, 151/5
सहावी विकेट – वॉशिंग्टन सुंदर 2 धावा, 153/6

चेन्नई सुपर किंग्ज डाव – 202/2

चेन्नई सुपर किंग्जच्या संपूर्ण डावाचा आढावा घेतला तर सलामीवीरांकडून चौकार आणि षटकारांची चर्चा होईल. ऋतुराज गायकवाडने घरच्या मैदानावर 99 धावा केल्या आणि आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक हुकले. मात्र, ऋतुराजने डेव्हन कॉनवेसोबत 182 धावांची भागीदारी केली, ही या मोसमातील सर्वोच्च भागीदारी आहे. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता पण त्याला केवळ 8 धावा करता आल्या.

पहिली विकेट – ऋतुराज गायकवाड 99 धावा, 182/1
दुसरी विकेट – एमएस धोनी 8 धावा, 192/2

सनरायझर्स हैदराबाद संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे यांच्या जागी डेव्हॉन कॉनवे आणि सिमरजीत सिंगला संधी मिळाली आहे. डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळतो.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (डब्ल्यूके), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जॅन्सन, उमरान मलिक.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा