गोल पोस्ट महाराष्ट्र पनवेलच्या माजी उपमहापौरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

पनवेलच्या माजी उपमहापौरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

पनवेल, २९ नोव्हेंबर २०२२ : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि आरपीआय पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या कळंबोली येथील राहत्या घरावर हल्ला झाला आहे. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी घरावर दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत घराचे बरेचसे नुकसान झाले आहे. तसेच हल्लेखोरांनी घराशेजारी उभी करण्यात आलेली वाहनेदेखील फोडली आहेत.

या घटनेत वीस ते पंचवीस अज्ञातांनी माजी ऊपमहापौर गायकवाड यांच्या घरावर हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या अज्ञातांनी वाहनांमधील महत्त्वाचे पेपर आणि दीड लाख रुपये रोख रक्कम चोरल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. त्या माध्यमातून पोलिस तपास करीत आहेत. संपूर्ण परिसरात पोलिस कसून शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version