गोल पोस्ट महाराष्ट्र रायगडच्या माणगावातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यानी केला ३ लाखांचा मुद्देमाल लंपास

रायगडच्या माणगावातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यानी केला ३ लाखांचा मुद्देमाल लंपास

माणगाव, रायगड ५ डिसेंबर २०२३ : रायगडच्या माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिश आस्वर करीत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ५ डिसेंबर रोजी १ ते १.२० वा. च्या दरम्यान मौजे कलानगर, इंदापूर येथील फिर्यादी अंकिता अरुण मांगले यांच्या राहत्या घरात दोन अनोळखी इसमांनी दारावर धक्का मारुन उघडून आत प्रवेश केला. त्यापैकी एक आरोपी तोंडाला पूर्ण कपड्याने झाकलेला व डोळे उघडे ठेवलेला मजबूत बांधा असलेला तसेच दूसरा सढपातळ व साधारण उंचीचा होता. त्यातील एकाने फिर्यादी यांचे अंगावर बसून त्यांचे तोंड दाबून त्यांना तु चुप बैठ असे हिंदीमध्ये बोलून धरून ठेवले. दुस-या आरोपीने कपाट उघडून सोबत आणलेल्या हत्याराने लॉकर तोडून ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन, फिर्यादी यांना त्यांचे घरात डांबून दोघे पळून गेले.

न्युज अनकट प्रतिनीधी : प्रमोद जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version