गोल पोस्ट महाराष्ट्र सराफा व्यापाऱ्याची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सराफा व्यापाऱ्याची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लातूर ५ डिसेंबर २०२३ : काही इसम लातूरच्या जुने गुळ मार्केट परिसरातील वाहन पार्किंग परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असून ते सराफ व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिसांचे पथक तात्काळ जुना गुळ मार्केट पार्किंग येथे पोहोचले.

बातमीमध्ये मिळालेल्या वर्णनावरून पार्किंग परिसरात संशयितरित्या थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली, तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तलवार, एक लोखंडी बतई व एक दातऱ्या असलेला धारदार विळा मिळून आला. हे आरोपी नाशिक व लातूर येथील असुन त्यांना पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करूनअटक करण्यात आली आहे. पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी : सलीम शेख

error: Content is protected !!
Exit mobile version