केंद्रीय कृषी मंत्र्यांनी टोळधाड नियंत्रण कारवायांचा घेतला आढावा

नवी दिल्ली, दि. २९ मे २०२०: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज दोन्ही  कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी आणि सचिव (डीएसी आणि एफडब्ल्यू) संजय अग्रवाल यांच्यासोबत टोळधाड नियंत्रण कारवायांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. तोमर म्हणाले की, सरकार या विषयाची गंभीरतेने दाखल घेत असून या परिस्थितीचा सामान करण्यासाठी तात्काळ काम करत आहे. केंद्र टोळबाधित राज्यांच्या निरंतर संपर्कात असून सल्ले व सुचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.

येत्या १५ दिवसात १५ फवारणी यंत्र ब्रिटन वरून येण्यास सुरुवात होईल. त्याव्यतिरिक्त महिना किंवा दीड महिन्यात अजून ४५ फवारणी यंत्रांची खरेदी केली जाईल. प्रभावी टोळधाड नियंत्रणासाठी उंच झाडे आणि दुर्गम ठिकाणी कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाईल तर हवाई फवारणीसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्याची योजना आहे

तोमर यांनी सांगितले की, टोळांच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळासह ११ प्रादेशिक नियंत्रण कक्ष आणि विशेष दलांची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास बाधित राज्यांना अतिरिक्त स्रोत आणि आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सचिवांनी मंत्र्यांना सांगितले की, सध्या टोळधाड नियंत्रण कार्यालयातील २१ मायक्रोनेयर आणि २७ अलवामास्ट (४७ फवारणी उपकरणे) टोळधाड नियंत्रणासाठी वापरली जात असून २०० अधिकारी देखील तैनात आहेत. आतापर्यंत वाळवंट क्षेत्रापलीकडे टोळधाड नियंत्रणासाठी राजस्थानमधील जयपूर, चित्तोडगढ, दौसा; मध्यप्रदेशातील श्योपूर, निमोच, उज्जैन आणि उत्तरप्रदेशमधील झांसी येथे तात्पुरते नियंत्रण शिबीर उभारण्यात आले आहेत. राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील ३३४ ठिकाणी सुमारे ५०,४६८ हेक्टर क्षेत्रात टोळ नियंत्रित केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा