केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ!

नवी दिल्ली, ८ जुलै २०२१: मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडतो आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलाय. यामध्ये एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील १५ मंत्र्यांना कॅबिनेट तर २८ मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय. दुसरीकडं केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची यादी

नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ वीरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य शिंदे
रामचंद्र प्रसाद सिंह
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरण रिजिजु
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेंद्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
पंकज चौधरी
अनुप्रिया सिंह पटेल
सत्यपालसिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंदलजे
भानू प्रतापसिंह वर्मा
दर्शना विक्रम जार्दोस
मीनाक्षी लेखी
अन्नपूर्णा देवी
ए नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट
बीएल वर्मा
अजय कुमार
देवूसिंह चौहान
भगवंत खुबा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ सुभाष सरकार
डॉ भागवत कराड
डॉ राजकुमार रंजन सिंह
डॉ भारती पवार
बिश्वेश्वर तुडू
शंतनू ठाकूर
डॉ मुंजापारा महेंद्रभाई
जॉन बार्ला
डॉ एल मुरुगन
डॉ निशीत प्रामाणिक

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा