नवी दिल्ली, १४ मे २०२१: देशाची परिस्थिती कोरोनामुळं बिकट झाली असून भारताच्या या परिस्थितीला केंद्र सरकारला धारेवर धरलं जात आहे. देश कोरोनामुळं आधीच हैराण झाला आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीयेत तर अनेक राज्यात ऑक्सिजन आभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र, या काळातही सत्तेवर आसलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काहीच भाष्य करत नाहीत.
नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया संघाचे सरचिटणीस नागेश करीयप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेपत्ता आसल्याची तक्रार दिल्ली पोलिसात दिली आली आहे. देश कोरोना काळात आतिशय कठीण परिस्थितीमधून जातोय. देशाचे गृहमंत्री अमित शाह मात्र या संकट समयी गायब झाले आहेत. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीनं अश्यावेळी पळून न जाता देशाची सेवा करावी. असं या तक्रारारीत म्हटलं आहे.
देशाची सद्य स्थिती पाहून अनेक जनमानसात सरकार बद्दल आक्रोश पहायला मिळतोय. तर कोरोनाच्या परिस्थिती वर सुप्रीम कोर्टानंही मोदी सरकारला फटकारलं आहे. जागतिक स्तरावर अनेक वृतसंस्थानी मोदी सरकार वर निशाना साधत देशातील परिस्थितीला जबाबदार धरलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र शांतच आसल्याचं चित्र आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव