केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरण, अफसर पाशाच्या चौकशीसाठी एनआयएचे पथक नागपुरात

नागपूर, १७ जुलै २०२३ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य सुत्रधार अफसर पाशाच्या चौकशीसाठी एनआयएचे पथक नागपुरात दाखल झाले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी अफसर पाशाबाबत काल माहिती घेतली. नागपूर पोलिसांकडून हे प्रकरण एनआयएकडे देण्यासाठी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी अफसर पाशा, जयेश पुजारी यांची एनआयए तपास करणार आहे. कालच अफसर पाशा याला पोलिसांनी बेळगाववरुन नागपुरात आणले आहे.काल दिवसभर नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी करण्यात आली. अफसर पाशाच्या सांगण्यावरुन जयेश पुजारी याने गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन १०० कोटींची मागणी केली होती.

नितीन गडकरी धमकी प्रकरणातील दुसरा आरोपी आतंकवादी अफसर पाशा याला चार दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे. नागपूर सेशन कोर्टाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नागपूर पोलीस अफसर पाशा याची चौकशी करणार आहेत.अफसर पाशा हा लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव आहे. अफसर पाशाची एनआयएची टीम चौकशी करण्यासाठी दाखल झाली आहे. पहिला आरोपी जयेश पुजारीच्या तपासादरम्यान अफसर पाशाची माहिती पुढे आली होती.

जयेश पुजारी कश्मिरी दहशतवादी अफसर पाशाच्या संपर्कात होता.अफसर पाशा हा ढाका आणि बेंगलूरू येथील बॅाम्बस्फोटाचा आरोपी आहे. युएपीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारीचा अफसर पाशा याने माईंड वॉश केल्याची माहिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा