केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली दि. ०८ ऑक्टोबर २०२०:सध्या कोरोना मुळे अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले.अश्यातच नरेंद्र मोदी यांच्या जवळचे आणि लोक जनता पार्टीचे सर्व्हेसर्वा केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांचं निधन झाले आहे.

केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली.गेल्या काही दिवसांपासून राम विलास पासवान यांचावर दिल्लीतल्या रूग्णालयात उपचार सुरू होते.वयाच्या ७४ व्या वर्षी पासवान यांनी अखेरचा श्वास घेतला.

सध्या निवडणूक जवळ येत आसून राम विलास पासवान यांची पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा बरोबर महागठबंधन मधे सरकार होते.तर आता हि पार्टी सध्याच्या निवडणुकीत महागठबंधन मधुन बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मधे महत्वाचे स्थान होते.आता त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या जाण्याने नरेंद्र मोदी यांना एक प्रकारे धक्का बसला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुख व्यक्त केले.”मी माझा मित्र आणि गरीबांचं कल्याण व्हाव यासाठी प्रयत्नशील असणारा एक मौल्यवान सहकारी गमावला”अशा शब्दात मोदींनी दु:ख व्यक्त केले.तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांनी देखील केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांना आदरांजली वाहिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा