गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिक येथे सफाई कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

नाशिक येथे सफाई कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

नाशिक, दि.९ जून २०२०: गेल्या अनेक दिवसांपासून त्रंबकेश्वर नगर परिषदेमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा अगदी तोडक्या मानधनात हे कर्मचारी काम करत आहे. या कामगारांच्या काही मागण्या आहेत. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.

वारंवार मागणी करूनही प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे सोमवारी( दि.८) रोजी या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःला अर्धे जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं. अवघ्या ३ ते ४ हजारात काम करा, अन्यथा घरी बसा असं प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या महामारीत आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असतानाही इतक्या कमी मानधनात काम कस करायचं असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेने ही सहभागी होत संबंधित कंत्राटदारांचा आणि त्यात हस्तक्षेप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.

प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्व कामगारांनी स्वतःला जमिनीत अर्धे गाडून घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

कामगारांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाडंगे यांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version