चिपळूण, ३ डिसेंबर २०२०: वाढीव वीजबिल देणाऱ्या महावितरणचा निषेध असो, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, वंचित आघाडीचा विजय असो…’ अशा गगनभेदी घोषणा देत वंचीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंदील आणि मेणबत्ती आंदोलन करीत महावितरणसमोर विजबिलांची होळी केली. कार्यकारी अभियंत्यांना कंदील भेट देत निवेदन दिलं.
महावितरणनं वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांना शॉक दिलाय. या विरोधात अनेकांनी जोरदार आंदोलन करीत निषेध सुरू केला.
जिल्हाध्यक्ष महेशभाई सावंत, महासचिव विनोद कदम, सचिव सुशांत जाधव, जिल्हा युवा उपाध्यक्ष सचिन जाधव, सुशील जाधव, दीपक पवार यांच्यासह चिपळूण तालुकाध्यक्ष दीपक कदम, राजापूरचे तालुकाध्यक्ष जुनेद बंदरकर, संगमेश्वरचे राजन मोहिते. खेडचे अध्यक्ष संतोष गमरे, चंद्रकांत जाधव, रमण मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनीधी: ज्ञानेश्वरी आयवळे