एसपी बालसुब्रह्मण्यम यांना अनोखी श्रद्धांजली

पुरी (ओड़िशा) २५ सप्टेंबर २०२०: सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज दि. २५ सप्टेंबर २०२० रोजीनिधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातलं एक पर्व संपलं असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अनेकांनी सुब्रमण्यम यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. मात्र ओड़िशा राज्यातल्या एका सॅण्ड आर्टिस्टनं एसपी बालसुब्रमण्यम यांना आपल्या कलाकृतीने आगळी – वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.

ओड़िशा राज्यात राहणारे सुदर्शन पटनायक हे एक सॅण्ड आर्टिस्ट आहे. ते समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूमध्ये चित्र काढतात. त्यामुळे त्यांनी आपल्या कलेतून एसपी बालसुब्रमण्यम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. सुदर्शन पटनायक यांनी ओड़िशा राज्यातल्या पुरी या समुद्रकिनाऱ्यावर वाळूद्वारे एसपी बालसुब्रमण्यम यांचे चित्र काढून त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी या सुंदर कलाकृतीचा फोटो आणि व्हिडिओ शेयर केला आहे. सुदर्शन पटनायक हे एक जागतिक कीर्तीचे सॅण्ड आर्टिस्ट असून भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. ते वेळोवेळी पुरी च्या समुद्रकिनाऱ्यावर आपल्या कलाकृती करत असतात. एखादी महत्वाची घटना सॅण्ड आर्टमधून सादर करत ते सामाजिक संदेश देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात. एसपी बालसुब्रमण्यम यांना सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत अनेक गाणी गायली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा