पुण्यातील संगम पुलावर मजुराला अज्ञाताकडून लूटमार

पुणे, दि.१० मे २०२०: पुण्यात सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत. त्यात पुण्यामध्ये परजिल्ह्यातील मजुर अडकलेले आहेत. त्या मजुरांकडे आपल्या गावी जाण्यासाठी देखील पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे पायी जाण्याचे धाडसही हे नागरिक करू लागले आहेत. त्यातच पुण्यात या प्रवासी युवक नागरिकाला मारहाण करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.

हा युवक पुण्यातील संगमवाडी पुलावरून बाणेरहून यवतमाळला चालत चालला होता. मात्र या युवकाला संगमवाडी परिसरातील काही युवकांनी गाठले व बेदम मारहाण करत त्याच्याकडील पाकिट, मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला , मात्र येथील स्थानिक युवक आणि रस्त्याने जाणाऱ्या सुमित यादव या धानोरी येथे राहणाऱ्या नागरिकाने त्या युवकाला त्या मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवले.

त्या मारहाण करणाऱ्या युवकाने सांगितले की, मी बाणेरहून यवतमाळला पायी चाललो आहे. मात्र रस्त्याने जात असताना काही जणांनी मला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीने त्याला सोडवले म्हणजे सुमित यादव याने फेबुकवर एक व्हिडिओ तयार करून या घटनेचा निषेध व्यक्त केला, हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असा आहे. सुमित याने त्याला वाघोलीपर्यंत सोडवले आहे. तिथून पुढे पोलीस प्रशासनाकडून त्याला त्याच्या गावी जाण्याची सोय करण्यात आली असल्याचे यादव यांनी सांगितले.

सुमितने केलेल्या या धाडसाने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आणि त्याने यातून माणुसकीचे दर्शनही घडवले आहे. हा व्हिडीओ पोलिसांनाही पाठवण्यात आला आहे.अधिक तपास सुरू आहे.

मात्र पुण्यासारख्या शहरात असले प्रकार घडत असतील तर हि पुणेकरांसाठी खूप निंदनीय अशी गोष्ट आहे. नाही तुम्हाला मदत करता येत तर निदान असे प्रकार तरी कुरु नका, असे आवाहनही सुमित यादव याने केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा