गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकांचा मृत्यू

तुळजापूर : मंगरूळ – इटकल महामार्गावरील मंगरूळ गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात( दि, 25) मंगळवारी रात्री दहा च्य सुमारास घडला आहे. मिळालेली प्राथमिक माहिती नुसार ,मंगरूळ – इटकल महामार्गावरील नंदिनी जयाजी सरडे यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाची धडक हिरो होंडा स्पलेंडर दुचाकीला बसली .या अपघातात नागनाथ मारुती खंडाळकर ( वय 30 )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला हे अध्यप समजू शकले नाही.व पुढील तपास तुळजापूर पोलीस स्टेशन करीत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version